Uncategorized

कामाचा विश्वास… गायकवाड कुटुंबाची ‘वरद’च्या माध्यमातून व्यवसायात यशस्वी भरारी!

विजय शिंदे

वरद कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात ठसा; बावडा येथे ‘वरद एंटरप्रायझेस’च्या माध्यमातून नव्या व्यवसायाचा शुभारंभ!

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी केवळ आर्थिक भांडवल पुरेसे नसते, तर त्यासाठी मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा, गुणवत्तेची बांधिलकी आणि ग्राहकांचा विश्वास या गोष्टी महत्त्वाच्या असतात. याच गुणांच्या जोरावर गिरझनी (ता. माळशिरस) येथील गायकवाड कुटुंबाने बांधकाम व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘वरद कन्स्ट्रक्शन’च्या माध्यमातून दर्जेदार कामाचा ठसा उमटवणाऱ्या या कुटुंबाने आता बावडा (ता. इंदापूर) येथे ‘वरद एंटरप्रायझेस’च्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

राहुल मधुकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरद कन्स्ट्रक्शनने बांधकाम क्षेत्रात आपला प्रवास यशस्वीपणे सुरू ठेवला आहे. राकेश राहुल गायकवाड आणि राहुल गायकवाड यांची पुढील पिढीही या व्यवसायात सक्रिय सहभाग घेत असून, अनुभव आणि नव्या विचारांची सांगड घालत व्यवसायाचा विस्तार केला जात आहे.

इंदापूर तालुक्यासह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील विविध ठिकाणी वरद कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून रस्ते बांधकाम, इमारत बांधकाम तसेच इतर विविध प्रकारची बांधकामे करण्यात आली आहेत. प्रत्येक कामामध्ये गुणवत्ता, दर्जा आणि कामातील सातत्य जपण्यावर गायकवाड कुटुंबाचा भर राहिला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात वरद कन्स्ट्रक्शनने विश्वासार्ह नाव निर्माण केले आहे.

बांधकाम क्षेत्रातील अनुभव आता नव्या व्यवसायात!

बांधकाम व्यवसायातील यशस्वी वाटचाल सुरू असतानाच गायकवाड कुटुंबाने आता बावडा (ता. इंदापूर) येथे ‘वरद एंटरप्रायझेस’ हा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रुतिक राहुल गायकवाड यांच्या माध्यमातून या नव्या व्यवसायाची जबाबदारी पुढे नेली जाणार आहे. पारंपरिक अनुभवासोबत आधुनिक व्यावसायिक दृष्टिकोनाची जोड देत या व्यवसायातूनही नवी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

एकीकडे गिरझनी येथील वरद कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे, तर दुसरीकडे बावडा येथील वरद एंटरप्रायझेसच्या माध्यमातून व्यवसायाचे नवे क्षितिज खुले होत आहे. वडिलांनी उभा केलेला व्यवसायाचा पाया अधिक भक्कम करत पुढील पिढीने त्यामध्ये नवनवीन संधी निर्माण करणे, हे गायकवाड कुटुंबाच्या प्रगतीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

कुटुंबाची एकजूट, अनुभवाची शिदोरी आणि गुणवत्तेची बांधिलकी या बळावर गायकवाड बंधूंची ही व्यावसायिक भरारी निश्चितच प्रेरणादायी आहे. वरद कन्स्ट्रक्शनने बांधकाम क्षेत्रात मिळवलेला विश्वास आणि वरद एंटरप्रायझेसच्या माध्यमातून सुरू होणारी नवी वाटचाल पाहता, भविष्यात या दोन्ही व्यवसायांच्या माध्यमातून गायकवाड कुटुंब यशाची आणखी नवी शिखरे गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button