Uncategorized

निरा-भीमा कारखान्यावर ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड; हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते फराळ वाटप

विजय शिंदे

शहाजीनगर : दिवाळी सणाचे औचित्य साधून शहाजीनगर येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊसतोडणी मजुरांसाठी दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांच्या शुभहस्ते ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बोलताना माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ऊसतोड मजूर हे साखर कारखानदारीचा महत्त्वाचा घटक आहेत. आपल्या कष्टाच्या जोरावर ते गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान देत असतात. दिवाळीच्या सणात या मजुरांचीही दिवाळी गोड व्हावी, त्यांना सणाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

यावेळी नुकत्याच पार पडलेल्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेले राजवर्धन पाटील यांचा निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दिवाळीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ऊसतोड मजुरांप्रती कृतज्ञता आणि आपुलकीची भावना व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button