Uncategorized

इंदापुरातील तहसीलदार विरोधी व समर्थक मोर्चांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

विजय शिंदे

इंदापूर : इंदापूर शहरात तहसीलदारांच्या विरोधात आणि समर्थनार्थ बुधवारी (ता. २५) काढण्यात आलेल्या दोन स्वतंत्र मोर्चे व सभांच्या आयोजकांवर इंदापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांची परवानगी नाकारण्यात आलेली असतानाही मोर्चे काढणे, तसेच मुख्य रस्त्यावर सभामंडप उभारून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप आयोजकांवर ठेवण्यात आला आहे.

तहसीलदारांच्या विरोधात भाजप व अन्य पक्षांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाप्रकरणी भाजपचे नगरपरिषदेतील गटनेते तथा विरोधी पक्षनेते अनिल पवार, संजय ऊर्फ डोनाल्ड शिंदे व इतर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई गणेश वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान, तहसीलदारांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे (रा. सराटी) आणि नवनाथ रूपनवर (रा. चाकाटी) यांच्यासह इतर आयोजकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तहसीलदारांच्या विरोधात आणि समर्थनार्थ एकाच दिवशी शहरात झालेल्या आंदोलनांनंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या आयोजकांवर कारवाई केल्याने इंदापूरच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button