Uncategorized

२५ नोव्हेंबरच्या सर्वपक्षीय मोर्चासाठी नेत्यांची तालुक्यात जनजागृती मोहीम; उद्या वडापुरी माळवाडी गटातील गावांना भेटी.

विजय शिंदे

मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नागरिकांना करणार आवाहन; सर्वपक्षीय नेते मैदानात

इंदापूर : येत्या २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी विविध पक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी आता मैदानात उतरले आहेत. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुक्यात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून, नेतेमंडळी गावोगावी जाऊन नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, तसेच काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

याच अनुषंगाने उद्या शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील वडापुरी-माळवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना नेतेमंडळी भेटी देणार आहेत. यावेळी स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून २५ नोव्हेंबरच्या सर्वपक्षीय मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येत मोर्चासाठी गावोगावी संपर्क साधत असल्याने या मोर्चाबाबत तालुक्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी काही दिवसांत तालुक्याच्या इतर भागांतही अशाच प्रकारे जनसंपर्क मोहीम राबविण्यात येणार असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button