इंदापूरात प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन.

विजय शिंदे
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर शहरातील तहसील कार्यालयासमोर रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध नृत्यांगना नर्गिस पुणेकर, चांडाळ चौकडीच्या करामती ची टीम तसेच मुंबईचा महिला दहीहंडी संघ सहभागी होणार आहे. यामुळे इंदापूरकरांना दहीहंडीचा थरार आणि मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मैदानाची पाहणी करण्यात आली. यावेळी इंदापूर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक तसेच प्रदीप गारटकर मित्र परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते.
दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी मित्र परिवाराच्या वतीने जय्यत तयारी सुरू असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



