Uncategorized

मतभेद असू शकतात, मात्र हिंसेचे समर्थन नाही; विद्यानंद बापट मारहाण प्रकरणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आक्रमक.

विजय शिंदे

पुणे : प्रतिनिधी

पुण्यात डीजेच्या आवाजाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तीव्र निषेध केला आहे. विचार वेगळे असू शकतात, मात्र मतभेद व्यक्त करण्यासाठी हिंसा हा मार्ग योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे की, एखाद्या विषयावर वेगवेगळी मते असू शकतात. एखाद्याची भूमिका पटत नसेल तर त्याला उत्तर संवादातून आणि वैचारिक भूमिकेतून देता येते. मात्र विचार मांडणाऱ्या व्यक्तीवर हात उचलणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही.

या प्रकरणी कठोर कारवाई करण्यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली असून अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यानंद बापट यांना पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश दिल्याची माहितीही मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, विचारस्वातंत्र्य आणि शांततामय संवादाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button