Uncategorized
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; इंदापूर तालुक्यात सकल मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन.

विजय शिंदे
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.पुणे–सोलापूर महामार्गावर हिंगणगाव येथे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र आले होते. यावेळी मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
आंदोलनादरम्यान काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.या रास्ता रोको आंदोलनात सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.



