Uncategorized

इंदापूरात भरत शेठ शहा मित्र परिवाराचा भव्य दहीहंडी उत्सव आज; गोविंदा पथकांसह नागरिकांमध्ये उत्साह.

विजय शिंदे


इंदापूर शहरात दरवर्षी उत्साहात साजरा होणारा दहीहंडी उत्सव यंदाही मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. नगराध्यक्ष भरत शेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य दहीहंडी उत्सव आज सोमवार, ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता इंदापूर शहरात जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर संपन्न होणार आहे.

यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, शहा परिवाराचे सर्वेसर्वा मुकुंद शहा, व इंदापूर शहर व परिसरातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या उत्सवासाठी काही दिवसांपूर्वी मैदानाचे भूमिपूजन नगराध्यक्ष भरत शेठ शहा यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी इंदापूर नगर परिषदेचे नगरसेवक, गटनेते, भरत शेठ शहा मित्र परिवारातील सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.


दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मैदानाची जय्यत तयारी करण्यात आली असून, परिसरातील गोविंदा पथकांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोरंजन कार्यक्रम, गोविंदा पथकांची थरारक मानवी मनोरे आणि जल्लोषपूर्ण वातावरण हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.


इंदापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक भरत शेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button