Uncategorized
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी ठराव मागविण्याचा कार्यक्रम जाहीर

विजय शिंदे
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., पुणे संचालक मंडळ निवडणूक सन २०२६-२७ ते २०३१-३२ साठी सभासद संस्थांकडून प्रतिनिधी ठराव मागविण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ नुसार पात्र सभासद संस्थांनी आपले ठराव संबंधित तालुका उपनिबंधक/सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सादर करावयाचे आहेत. ठराव सादर करण्याची मुदत दि. २४ ऑगस्ट २०२६ ते दि. २२ सप्टेंबर २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.
सभासद संस्थांनी निवडणूक नियमांचे पालन करून विहित नमुन्यात ठराव सादर करावेत, असे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, पुणे विभाग यांनी जाहीर सूचनेद्वारे कळविले आहे.



