Uncategorized

इंदापूरच्या बिजवडीत राणीला “गुल्ल्या” दाखवत होते.!! स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिसांची धडक कारवाई, ११ जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल.

विजय शिंदे

बिजवडी (ता. इंदापूर) येथे पत्र्याच्या शेडच्या बाजूला सुरू असलेल्या जुगाराच्या डावावर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि इंदापूर पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम व पत्त्यांसह एकूण ४३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. २२ ऑगस्ट) रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास बिजवडी गावच्या हद्दीत मंगेश खराडे यांच्या घराजवळील पत्र्याच्या शेडच्या बाजूला काही जण रोख रक्कम व पत्त्यांची पाने घेऊन पैशांवर जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि इंदापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत नितीन गोरख तळेकर, विकास बबन सोनवणे, महेश मच्छिंद्र जाधव, संतोष महादेव गिरी, आदिनाथ पोपट सरवदे, मंगेश बाळू खराडे, शुभम बापुराव तळेकर, उत्तरेश्वर जगन्नाथ पळसकर, गणेश महादेव दयाळ, सुमित लोंढे आणि सोनू मधुकर चव्हाण यांच्याविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपींकडून तसेच घटनास्थळावरून विविध रकमेची रोकड आणि पत्त्यांची पाने असा एकूण ४३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये आरोपींच्या अंगझडतीतून रोख रक्कम व पत्त्यांची पाने, तसेच घटनास्थळावरून ८ हजार ६०० रुपयांची रोकड मिळून आली. याशिवाय पत्त्यांचा बॉक्स आणि बॉलपेनही जप्त करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश मच्छिंद्र ढेरे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार मोरे यांनी गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button