वडापुरी-माळवाडी गटात शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचे वाटप!

विजय शिंदे
पुणे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून वडापुरी-माळवाडी जिल्हा परिषद गटातील शहा येथे शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून गटातील विविध ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे, माळवाडी पंचायत समिती सदस्य कल्पना पाटील, वडापुरी पंचायत समिती सदस्य अर्चना खबाले, मा. डॉ. संजय शिंदे, डॉ. सचिन खेमलापुरे,डॉ मारुती काझडे सरपंच दिलीप पाटील, अजित खबाले, विष्णू पाटील, विजय पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने चारा नव्याने निर्माण करता यावा यासाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवल्याचे जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे म्हणाले.



