Uncategorized

प्रगती विद्यालय लोणी देवकर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणासह विविध स्पर्धांचे आयोजन.

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री प्रगती विद्यालय, लोणी देवकर येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडले.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व विद्यार्थी, पालक व उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक लहू जाडकर यांनी व्यक्त केले.

तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन व सांस्कृतिक जाणीव वाढीस लागण्यास मदत झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button