भाटनिमगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात.

विजय शिंदे
भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथे आज २१ ऑगस्टपासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. या सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असून, सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या काळात कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन, भारूड आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गावातील अन्नदात्यांकडून सात दिवस अन्नदान व अल्पोहार दिला जातो, कालच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होते त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. विविध भजनी मंडळांनी सहभाग घेत भक्तिरसाची अनुभूती दिली. गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, सप्ताहाच्या माध्यमातून अध्यात्मिक विचारांचा प्रसार होत आहे.या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व्यासपीठ चालक ह. भ. प. संतोष मगर महाराज व समस्त ग्रामस्थ आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



