Uncategorized

भाटनिमगाव येथे हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

विजय शिंदे

भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इंदापूर पंचायत समितीच्या सदस्या अर्चना अजित खबाले व अजित खबाले यांच्या पुढाकारातून गावात वृक्षारोपण तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन पंजाबराव गायकवाड, ज्येष्ठ नेते मोहन खबाले, माजी सरपंच अजित खबाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे,ह.भ.प. संतोष मगर महाराज, माजी चेअरमन नागनाथ खबाले, मुख्याध्यापक योगीराज गाडेकर, समाधान भोसले, दत्तात्रय गवळी, चंद्रकांत चव्हाण, विकास खबाले, महिपत कदम, बालाजी गवळी, विठ्ठल चव्हाण, राजेश साळुंखे, बाळासाहेब पवार यांच्यासह शिक्षक कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मदत मिळाली असून वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button