Uncategorized

पुण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे नियोजन

विजय शिंदे

पुणे | दि. १६ ऑक्टोबर २०२६

आगामी पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात महायुतीचे मंत्री,प्रमुख नेते, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि विविध पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचे नियोजन, रणनीती आणि संघटनात्मक समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काम करावे, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी नियोजन करावे आणि संघटनात्मक पातळीवर समन्वय राखावा, यावर बैठकीत भर देण्यात आला. आगामी निवडणुकीत महायुतीची ताकद एकत्रितपणे उभी करून उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.

या बैठकीस राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, आमदार महेशदादा लांडगे, शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्यासह महायुतीचे विविध नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमुळे आगामी पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या पातळीवर तयारीला वेग येण्याची शक्यता असून, निवडणुकीतील प्रचार आणि संघटनात्मक हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button