Uncategorized

इंदापूरमधून स्मिताताई जाधव, कौस्तुभ गावडे यांना सर्वाधिक मताधिक्य देणार : प्रदीप गारटकर.

विजय शिंदे

भाजपच्या प्रचार बैठकीत विश्वास; प्रवीण माने यांची प्रमुख उपस्थिती

इंदापूर : शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात महिला संघटन, सर्जनशीलता व धोरणात्मक नेतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे या दोन्ही युवा उमेदवारांना इंदापूर तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याचा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केला.

मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) इंदापूर शहरातील सोनाई पॅलेस येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गारटकर बोलत होते. भाजपचे युवा नेते प्रवीणभैय्या माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

गारटकर म्हणाले की, दोन्ही उमेदवार युवा असून पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते तत्पर राहतील. भाजपने या दोन्ही उमेदवारांना उमेदवारी देऊन योग्य संधी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विचार, कार्यपद्धती आणि काम करण्याची ऊर्जा ही आदर्शवत असून, त्याचा निश्चितच उमेदवारांना फायदा होईल.

कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घ्यावी!

इंदापूर तालुक्यात भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारासाठी सक्रिय झाले असून, दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी संघटितपणे काम सुरू असल्याचेही गारटकर यांनी नमूद केले.

या बैठकीला अभिजित रणमोडे, डॉ. आकाश कांबळे, मारुती वनवे, तानाजी थोरात, रामचंद्र गजानन वाकसे, बाबासाहेब चवरे, मोहन दुधाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष राम आसबे, राजकुमार जठार, तेजस देवकाते, शहराध्यक्ष किरण गानबोटे, इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे. शुभम शिंगाडे, वसीम बागवान, पांडुरंग मारकड, प्रदीप पाटील, राजेश जामदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन सुधीर करगळ यांनी केले, तर मयूर शिंदे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button