भाजपा-महायुतीचा निर्धार; ‘पदवीधर’-‘शिक्षक’ मतदारसंघासाठी उमेदवारांना AB फॉर्म.

विजय शिंदे
पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव तसेच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते अधिकृत AB फॉर्म सुपूर्द करण्यात आला.
पुणे शहर भाजपा कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. केंद्रीय सहकार व नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजपा-महायुतीकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या दोन्ही जागांवर विजय मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला.
पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाण ठेवून त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी दोन्ही उमेदवार काम करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह आमदार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांना उपस्थित मान्यवरांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.



