Uncategorized

उजनी परिसरातील ‘द सीड’ प्रकल्पाला विरोध; २८ सप्टेंबरला आंदोलन.

विजय शिंदे

उजनी धरण परिसरात सुमारे ₹१.१४ लाख कोटींच्या गुंतवणुकीचा ‘द सीड’ (The SEED) AI डेटा सेंटर व ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. ६८० एकरहून अधिक क्षेत्रावर होणाऱ्या या प्रकल्पात AI डेटा सेंटर, २ GW फ्लोटिंग सोलर प्रकल्प आणि १,००० MW बॅटरी स्टोरेजचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकल्पासाठी उजनीच्या पाण्याचा वापर होण्याच्या शक्यतेवरून स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पाणी, शेती आणि परिसराच्या भविष्यातील विकासाबाबत ग्रामपंचायती व नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सोमवार, २८ सप्टेंबर रोजी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button