Uncategorized

“संतांच्या विचारांचा आणि हरिनामाचा मार्ग हा जीवनाला योग्य दिशा देणारा; भाटनिमगाव येथे उत्तरेश्वर महाराज जाधव यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न.

विजय शिंदे

इंदापूर : प्रतिनिधीअखंड हरिनाम सप्ताह व भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त भाट निमगाव (ता. इंदापूर) येथे गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी वांगी संस्थानचे प्रमुख भागवताचार्य ह. भ. प. उत्तरेश्वर महाराज जाधव यांची सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली.

यावेळी बोलताना ह. भ. प. उत्तरेश्वर महाराज जाधव म्हणाले की, “संतांच्या विचारांचा आणि हरिनामाचा मार्ग हा जीवनाला योग्य दिशा देणारा आहे. ज्ञानेश्वरी, भागवत आणि संत साहित्याच्या माध्यमातून समाजात संस्कार, भक्ती आणि सदाचाराची शिकवण मिळते. प्रत्येकाने आपल्या जीवनात नामस्मरण व सत्कर्माचा अंगीकार करावा.”या कीर्तन सेवेस मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सप्ताहाच्या आयोजनासाठी ग्रामस्थ व संयोजकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button