Uncategorized

सणसर येथे ‘महाराजस्व अभियान’ व ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्याची मागणी; पूजा घोलप यांचे तहसीलदारांना निवेदन.

विजय शिंदे

सणसर हे इंदापूर शहरापासून पश्चिमेला सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असल्याने सणसर तसेच पंचक्रोशीतील नागरिकांना महसूल व इतर शासकीय कामांसाठी वारंवार इंदापूर तहसील कार्यालयात यावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ व प्रवासाचा खर्च होत असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचे आर्थिक नुकसानही होते,
नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन युवा नेत्या पूजा घोलप यांनी इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांची भेट घेऊन सणसर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ तसेच ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम आयोजित करण्याबाबत निवेदन दिले.

या उपक्रमाच्या माध्यमातून सणसर व पंचक्रोशीतील नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्यास नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. तसेच नागरिकांना थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून आपल्या समस्या व प्रलंबित कामांबाबत मार्गदर्शन घेता येणार आहे.

यामुळे नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च तसेच रोजंदारीचे नुकसान वाचण्यास मदत होणार असून, शासनाच्या सेवा प्रत्यक्ष जनतेच्या दारी पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सणसर येथे लवकरच हे अभियान आयोजित करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे पूजा घोलप यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button