Uncategorized

जिल्हा नियोजन समितीवर प्रवीण माने यांना संधी मिळण्याची शक्यता; इंदापूर भाजपमध्ये नव्या उमेदीची चर्चा.

विजय शिंदे..

पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी सोनाई परिवाराचे संचालक, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती तसेच भारतीय जनता पक्षाचे युवा नेते प्रवीण माने यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सन 2024 मध्ये झालेल्या इंदापूर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या प्रवीण माने यांनी मतदारसंघातून सुमारे 39 हजारांच्या आसपास मते घेतली होती. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, पक्षाकडून त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

इंदापूर तालुक्यात प्रवीण माने यांचा मोठा जनसंपर्क असून, ग्रामीण भागातील विकासकामे, सहकार क्षेत्र आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांना संधी मिळाल्यास इंदापूर तालुक्यातील विकासकामांना अधिक गती मिळण्यासोबतच भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाला देखील नवी ताकद मिळण्याची शक्यता आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर मोहोळ तालुक्याचे माजी आमदार यशवंत माने भाजपचे युवा नेते प्रवीण माने यांच्या भाजप प्रवेशाने इंदापुरात भाजपची ताकद वाढली आहे.प्रवीण माने यांना ही संधी मिळावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांना जबाबदारी मिळाल्यास इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी नवी ऊर्जा आणि बळ मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्यांकडे पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button