Uncategorized

पारंपरिक वाद्यांच्या निनादात इंदापुरात तरुणाई थिरकली; भरत शेठ शहा मित्र परिवाराच्या दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

विजय शिंदे

इंदापूर शहरात नगराध्यक्ष भरत शेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात तरुणाई मोठ्या उत्साहात थिरकली. शहर व परिसरातील नागरिकांनी या उत्सवाचा आनंद लुटला.

या कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा बँकेचे माजी संचालक अविनाश घोलप, मुकुंदशेठ शहा यांच्यासह इंदापूर नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी तसेच तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित मान्यवर व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजक भरत शेठ शहा मित्र परिवाराचे कौतुक करत, इंदापूरच्या सांस्कृतिक परंपरेला जपणाऱ्या या आयोजनाचे अभिनंदन केले. पारंपरिक वाद्यांच्या निनादाने संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. तरुणाईसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button