मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ इंदापूर तालुक्यात रास्ता रोको आंदोलन.

विजय शिंदे
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज इंदापूर तालुक्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
मनोज जरांगे-पाटील हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असून, उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये गंभीर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र सरकारकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केला आहे.
गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, हिंगणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात इंदापूर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
“सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.



