खासदार सुप्रिया सुळे यांची निमगाव केतकीतील नागवेलीच्या पान बाजाराला भेट.

विजय शिंदे
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील प्रसिद्ध नागवेलीच्या पान बाजाराला भेट देऊन शेतकरी व पान विक्रेत्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी नागवेली पान उत्पादन, बाजारपेठेतील स्थिती, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच विक्री व्यवस्थेबाबत माहिती घेतली. निमगाव केतकी परिसरातील नागवेलीच्या पानाला राज्यासह विविध भागांत मागणी असून, या व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकरी व विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष तेजसिहं पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सागर मिसाळ, अमोल भिसे, छाया पडसळकर व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



