Uncategorized

ई-टेंडर पद्धतीविरोधात मच्छिमारांचे आंदोलन; स्थानिक मच्छिमारांवर अन्याय होऊ नये – खा. सुप्रिया सुळे.

विजय शिंदे

इंदापूर परिसरातील उजनी जलाशयांमध्ये मासेमारीसाठी राबविण्यात येणाऱ्या ई-टेंडर पद्धतीमुळे स्थानिक व पारंपरिक मच्छिमारांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनाला पाठिंबा देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक मच्छिमारांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.

पारंपरिक मच्छिमारांच्या रोजीरोटीचा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने त्यांचे म्हणणे ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

“कोणत्याही परिस्थितीत स्थानिक मच्छिमारांवर अन्याय होता कामा नये, ही आमची ठाम भूमिका आहे. शासनाने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या रास्त मागण्यांची पूर्तता करणे गरजेचे आहे,” अशी भूमिका खा. सुप्रिया सुळे यांनी मांडली.

जलाशयांवर अवलंबून असलेल्या पारंपरिक मच्छिमारांचे हक्क आणि रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button