Uncategorized

इंदापूर भाजपची महत्त्वपूर्ण बैठक; मतदार याद्यांतील दुबार नावांच्या तपासणीसाठी कार्यकर्त्यांना सूचना.

विजय शिंदे

इंदापूर : भारतीय जनता पक्षाच्या इंदापूर तालुका संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक आज जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आगामी काळातील संघटनात्मक कामकाज तसेच मतदार याद्यांमधील दुबार नावे व इतर त्रुटींबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी भाजप नेते प्रदीप गारटकर, बांधकाम सभापती प्रविण माने, आकाश कांबळे, गजानन वाकसे, किरण गानबोटे, राम आसबे,तेजस देवकाते, राजकुमार जठार, मारुती वनवे, सदानंद शिरदाळे माऊली वाघमोडे, मोहन दुधाळ, पांडुरंग मारकड, प्रदीप पाटील, सतीश पांढरे यांच्यासह सर्व बीएलए-२ उपस्थित होते.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा सुमारे ५३ हजार मतदान कमी झाले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये काही ठिकाणी दुबार नावे आढळून आल्याचे सांगण्यात आले. येत्या दोन दिवसांत प्रत्येक बूथवरील मतदार याद्यांची सखोल तपासणी करून दुबार नावे कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे एसआयआर इंदापूर तालुकाप्रमुख माऊली चवरे यांनी दिली.

प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांची कार्यकर्त्यांनी बारकाईने पाहणी करावी. दुबार नावे, मतदारांची नावे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी आढळल्यास तात्काळ पक्षाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी केले.

दरम्यान, यापूर्वी भाजप नेते प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील दुबार नावांचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथवरील मतदार यादीचा अभ्यास करून काही तक्रार किंवा त्रुटी आढळल्यास ती पक्षाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन प्रदीप गारटकर तसेच भाजप नेते प्रविण माने यांनी केले.

मतदार याद्यांची अचूकता आणि बूथनिहाय पडताळणीसाठी कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button