Uncategorized

सोलापूर जिल्ह्यातून चारा वाहतूक व विक्रीवर बंदी

विजय शिंदे

सोलापूर : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पशुधनासाठी उपलब्ध चाऱ्याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा सर्व प्रकारचा चारा व मुरघास इतर जिल्ह्यात किंवा राज्यात वाहतूक करून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये हा आदेश काढण्यात आला असून, जून २०२७ अखेरपर्यंत तो लागू राहणार आहे. पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button