सहकारातून समृद्धीचा वटवृक्ष : निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याची यशोगाथा.

श्री सुभाष घोगरे
कार्यालयीन अधीक्षक निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर इंदापूर
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून आणि शेतकरी हिताच्या विचारातून शहाजीनगर परिसरात उभा राहिलेला निरा-भिमा सहकारी साखर कारखाना आज सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था म्हणून ओळखला जात आहे. परिसरातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी या कारखान्याची स्थापना करण्यात आली आणि त्यातून हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षम व्यवस्थापनाच्या जोरावर शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य दरात ऊस बिल देण्याची परंपरा निर्माण केली आहे. त्यामुळे हा कारखाना शेतकरी विश्वासाचे केंद्र बनला असून अनेक पुरस्कारांनी कारखान्याचा गौरव झाला आहे.
कारखान्याच्या चेअरमन भाग्यश्री ताई हर्षवर्धन पाटील, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे निरा-भिमा कारखान्याने प्रगतीची नवी शिखरे गाठली आहेत. उत्कृष्ट कार्यक्षमता, पारदर्शक कारभार आणि शेतकरी केंद्रित धोरणांमुळे कारखान्याने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लावलेल्या या सहकाराच्या छोट्याशा रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या कारखान्यामुळे परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आणि ग्रामीण भागाच्या विकासाला मोठा हातभार लागला.शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत उभारलेली ही संस्था हर्षवर्धन पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची साक्ष देत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सहकार, शेती आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला मानाचा मुजरा.




