Uncategorized

सहकार क्षेत्राला बळ देणारे नेतृत्व : हर्षवर्धन पाटील साहेब.

मा श्री शरद जामदार

संचालक छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर.

इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये सहकार क्षेत्राचे योगदान मोठे राहिले आहे. या सहकार चळवळीला व्यापक स्वरूप देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला असता, इंदापूर तालुक्यात उभारलेले पतसंस्था, विकास सोसायट्या आणि सहकारी संस्थांचे जाळे हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण ठरते.

सहकार मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना हर्षवर्धन पाटील यांनी गावागावात विकास सोसायट्यांची उभारणी व मजबुतीकरण करण्यावर भर दिला. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक कर्ज सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, आर्थिक अडचणींवर मात करता यावी आणि ग्रामीण भागातील पैसा ग्रामीण भागातच फिरावा, यासाठी सहकार संस्थांना चालना देण्यात आली.इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकास सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेतीसाठी आर्थिक मदत आणि विविध सुविधा मिळू लागल्या. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले तसेच सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली.पतसंस्थांच्या वाढत्या जाळ्यामुळे अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. गावपातळीवर आर्थिक व्यवहार वाढले आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हक्काची आर्थिक व्यवस्था उपलब्ध झाली. सहकारातून समृद्धी हे धोरण प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला.

पूर्वी अनेक शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक गरजांसाठी खाजगी सावकारांवर अवलंबून राहावे लागत होते. सहकारी संस्थांच्या बळकटीकरणामुळे या परिस्थितीत मोठा बदल झाला. कमी व्याजदरात संस्थात्मक कर्ज सुविधा उपलब्ध झाल्याने खाजगी सावकारीला मोठ्या प्रमाणात आळा बसला.हर्षवर्धन पाटील यांनी सहकाराला केवळ आर्थिक व्यवहाराचे माध्यम न मानता ग्रामीण विकासाचे प्रभावी साधन मानले. शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून उभारलेली सहकाराची ही चळवळ इंदापूर तालुक्याच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागाला आर्थिक बळ देणाऱ्या या कार्याची आठवण करून देत त्यांना निरोगी, दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button