Uncategorized

अनाथ आश्रमातील मुलांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दिवाळी; महारुद्र पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकीची परंपरा

विजय शिंदे

इंदापूर : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र, या आनंदापासून कोणीही वंचित राहू नये, या भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी नेहमीप्रमाणे यंदाही अनाथ आश्रमातील मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या उपक्रमातून त्यांनी सामाजिक बांधिलकीची परंपरा यंदाही कायम राखली.

यावेळी इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ॲड. इनायतअली काझी, महिला अध्यक्षा छाया पडसळकर, अक्षय कोकाटे, विकास खिल्लारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आश्रमातील मुलांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेत उपस्थितांनी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

यावेळी बोलताना महारुद्र पाटील म्हणाले, की राज्यात यंदा दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करताना समाजातील वंचित आणि गरजू घटकांचाही विचार होणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दरवर्षी अनाथ आश्रमातील मुलांसोबत दिवाळी साजरी केली जाते. यंदाही ही परंपरा कायम ठेवत मुलांसोबत आनंदाचे क्षण घालविण्याचा प्रयत्न केला आहे.

दिवाळीचा खरा आनंद हा केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आहे, हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button