Uncategorized

इंदापूर येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रतिष्ठानतर्फे स्त्री जन्मोत्सवाचे आयोजन.

विजय शिंदे

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रतिष्ठान, इंदापूर यांच्या वतीने जश्ने ईद मिलादुन्नबी व प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने बुधवार दि. २६ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या मुलींच्या व मातांच्या भेटी घेऊन साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तसेच गुरुवार दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत स्त्री जन्माचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास इंदापूर चे नगराध्यक्ष भरतशेठ शहा, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीपदादा गारटकर, नगरसेवक शकीलभाई सय्यद, मोहोळ नगर परिषदेचे नगरसेवक एजाज तलफदार, मुस्लिम क्रो ऑफ बँकेचे संचालक बारामतीचे नगरसेवक अल्ताफ सय्यद, रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभाग सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष इनायत अली काझी यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सदर कार्यक्रम डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुशीरखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button