Uncategorized

पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची संघटनात्मक नियुक्ती जाहीर.

विजय शिंदे

मुंबई | ६ ऑक्टोबर २०२६

आगामी पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

या नियुक्तीनुसार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पुणे शिक्षक व पदवीधर निवडणूक समितीच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर केंद्रीय सहकार व नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय प्रदेश सरचिटणीस राजेशदादा पांडे यांची प्रमुख, शरद लाड यांची सह-प्रमुख तसेच डॉ. प्रथम कोळे यांची सह-प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग दिल्याचे या नियुक्त्यांमधून स्पष्ट होत आहे. नियुक्त्या तात्काळ लागू करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button