Uncategorized

इंदापुरात उद्या महायुतीचा महामेळावा; भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ.

विजय शिंदे

इंदापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी इंदापुरात ‘महायुतीचा महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्यात पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

हा महामेळावा सकाळी ११ वाजता इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे होणार असून, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button