कर्मयोगी कारखाना निवडणुकीत १० उमेदवार बिनविरोध.? पळसदेव, कालठण गटात इच्छुकांमध्ये चुरस.

विजय शिंदे
वैध उमेदवारांची यादी जाहीर; अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार
इंदापूर : महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी वैध नामनिर्देशनपत्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, ‘ब’ वर्ग संस्था तसेच शेळगाव व भिगवण ऊस उत्पादक गट बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, पळसदेव आणि कालठण सर्वसाधारण प्रतिनिधी गटांत इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, कोण माघार घेणार आणि कोण निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
जाहीर झालेल्या यादीत इंदापूर सर्वसाधारण गटात ७, कालठण गटात ८, पळसदेव गटात ८, भिगवण गटात ४, तर शेळगाव गटात ३ उमेदवारांचा समावेश आहे. महिला राखीव गटात ३, इतर मागास प्रवर्गात २, भटक्या-विमुक्त जाती व जमाती प्रवर्गात २, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात १ आणि ‘ब’ वर्ग सहकारी संस्था गटात २ उमेदवार वैध ठरले आहेत.
गटनिहाय वैध उमेदवारांची संपूर्ण यादी
१. सर्वसाधारण प्रतिनिधी गट क्रमांक १ — इंदापूर १. गायकवाड हिम्मत सुभेदार २. गुरगुडे पंडित मच्छिंद्र ३. गुरगुडे भास्कर सुभाष ४. शिंदे शांतिलाल दत्तात्रय ५. शुक्ला राकेश रमेशप्रसाद ६. सरडे रविंद्र वामन ७. सरडे वामन पंढरीनाथ
२. सर्वसाधारण प्रतिनिधी गट क्रमांक २ — कालठण १. कोकणे दादाराम भगवान २. जाधव हनुमंत अंकुश ३. पवार संपत विक्रम ४. देवकर निलेश शामराव ५. पाटील हर्षवर्धन शाहाजीराव ६. पारेकर हरिश्चंद्र सदाशिव ७. भोंगळे छगन धोंडीबा ८. शहाणे अंकुश दत्तात्रय
३. सर्वसाधारण प्रतिनिधी गट क्रमांक ३ — पळसदेव १. करे लक्ष्मण कृष्णा २. काळे महेंद्र पांडुरंग ३. काळे संतोष लक्ष्मण ४. देवकर प्रवीण यादववराव ५. देवकर राजेंद्रकुमार प्रतापराव ६. देवकर श्रीकांत शिवराव ७. पाटील राजवर्धन हर्षवर्धन ८. शिंदे विजयकुमार काशिनाथ
४. सर्वसाधारण प्रतिनिधी गट क्रमांक ४ — भिगवण १. खर्च विजय विठ्ठल २. जाधव पराग रमेशराव ३. जाधव प्रमिला रमेशराव ४. निकम रणजित नामदेव
५. सर्वसाधारण प्रतिनिधी गट क्रमांक ५ — शेळगाव १. गायकवाड रोहित राजेंद्र २. नलवडे बिभीषण कल्याण ३. शिंगाडे अतुल शिवाजी
६. इतर मागास प्रवर्ग १. मोहोळकर वसंत खंडू २. भोंगळे छगन धोंडीबा
७. भटक्या-विमुक्त जाती व जमाती १. पारेकर हरिश्चंद्र सदाशिव २. पारेकर हिरा शंकर
८. महिला राखीव प्रतिनिधी १. पवार रत्नमाला संपत २. पवार शारदा कुबेर ३. व्यवहारे सुमन नारायण
९. अनुसूचित जाती-जमाती १. जाधव अमोल सुभाष
१०. ‘ब’ वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था १. पाटील हर्षवर्धन शाहाजीराव २. पाटील राजवर्धन हर्षवर्धन
अर्ज माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट
कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटांतील राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. विशेषतः पळसदेव आणि कालठण गटांमध्ये उमेदवारांची संख्या लक्षवेधी असल्याने या गटांत कोण माघार घेणार, यावर निवडणुकीची दिशा ठरण्याची शक्यता आहे. अर्ज माघारीच्या मुदतीनंतरच किती जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आणि कोणते गट बिनविरोध होणार, हे स्पष्ट होईल.



