Uncategorized

भीमा नदीवरील बंधाऱ्यांमुळे शेती फुलली; इंदापूर तालुक्याच्या विकासाला मिळाली नवी दिशा.

सौ अर्चना अजित खबाले

सदस्या पंचायत समिती इंदापूर

इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. ग्रामीण भागातील शेती, पाणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. पाण्याची उपलब्धता वाढवून शेती समृद्ध करण्यासाठी त्यांनी विविध सिंचन प्रकल्प व बंधाऱ्यांच्या उभारणीसाठी प्रयत्न केले.भीमा नदीवरील भाटनिमगाव येथील बंधारा तसेच भांडगाव, अवसरी, बेडसिंग, वडापुरी, सुरवड परिसरातील बंधाऱ्यांमुळे या भागातील शेतीला मोठा आधार मिळाला आहे. या बंधाऱ्यांमुळे नदीतील पाण्याचा साठा वाढला, भूजल पातळी सुधारली आणि हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली.पूर्वी पाण्याअभावी मर्यादित पीक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या जलसंधारण कामांमुळे मोठा फायदा झाला. ऊस, फळबागा, भाजीपाला आणि विविध नगदी पिकांचे उत्पादन वाढले असून परिसरातील शेती अधिक समृद्ध झाली आहे. भीमा नदीवरील हे बंधारे शेतकऱ्यांसाठी विकासाचे आणि समृद्धीचे प्रतीक ठरले आहेत.शेतकऱ्यांच्या जीवनात पाण्याचे महत्त्व ओळखून जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम हर्षवर्धन पाटील यांनी केले.

पाणी उपलब्ध झाले की गावाची प्रगती होते, शेतकरी सक्षम होतो आणि संपूर्ण परिसराचा विकास होतो, या विचारातून त्यांनी सिंचन सुविधांना चालना दिली.म्हणूनच भीमा नदीवरील बंधारे हे केवळ जलसाठ्याचे प्रकल्प नसून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांना बळ देणारे विकासाचे केंद्र ठरले आहेत.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या विकासाभिमुख कार्याला मानाचा मुजरा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button