Uncategorized

सरडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सन्मान; रवींद्र सरडे यांच्या बिनविरोध निवडीचा आनंदोत्सव

विजय शिंदे

इंदापूर : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी रवींद्र सरडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री तथा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

कारखान्याचे संचालक वामनराव सरडे यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी आपुलकी व्यक्त करत त्यांचा सन्मान केला. रवींद्र सरडे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने सरडेवाडी परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी विद्यमान संचालक रवींद्र सरडे, दगडू शिंदे, प्रशांत सरडे, संतराम सरडे, राजाराम सागर, सरपंच सिताराम जानकर, आप्पासाहेब माने, सतीश चित्राव, विजय शिंदे, लालासाहेब पिंपरे, सचिन शिरसाट, विक्रम जाधव, अनिल तोबरे, पप्पू गायकवाड, रवी गायकवाड, भाऊसाहेब चित्राव, सोमनाथ नायकुडे, संतोष दातखिळे, अवधूत तोबरे, दशरथ भगत, राजेंद्र सरडे व प्रवीण सरडे यांच्यासह सरडेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button