Uncategorized

चुरशीच्या निवडणुकीत हर्षदा देशमुख-जाधव विजयाच्या उंबरठ्यावर, अधिकृत औपचारिक घोषणाच बाकी.

विजय शिंदे

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी निर्णायक आघाडी घेत विजयाच्या उंबरठ्यावर धडक मारली आहे.

पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत हर्षदा देशमुख यांना तब्बल १ लाख १२ हजार ३७७ मते मिळाली असून, विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ११३ मतांचा कोटा गाठण्यासाठी त्यांना केवळ ७३६ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता त्यांच्या विजयाची केवळ अधिकृत औपचारिक घोषणाच बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मतमोजणीची सद्यस्थिती आणि मतांचा कोटा पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत झालेल्या या मतदानात एकूण २ लाख २६ हजार २२४ मते वैध ठरली आहेत.

वैध मते : २,२६,२२४

विजयासाठी आवश्यक कोटा : १,१३,११३ मते (वैध मतांच्या ५०% + १ मत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button