जेजुरी येथे शनिवारी भाजप युवा मोर्चाचा ‘युवा निर्धार मेळावा’

विजय शिंदे
जेजुरी : भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे ग्रामीणच्या वतीने युवकांच्या सामाजिक, शैक्षणिक, रोजगार व संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यासाठी ‘युवा निर्धार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जेजुरी येथील मार्तंड सभागृह, जेजुरी–नीरा रोड येथे होणार आहे.
मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजेश दादा पांडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहुल कुल, आमदार योगेश टिळेकर, आमदार विक्रम पावसकर आदी उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय भाजप प्रवक्ते सदाशिव खाडे, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार राम सातपुते, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार संग्राम थोपटे तसेच आमदार अशोक टेकवडे यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांशी संबंधित विविध विषयांवर संवाद व चर्चा करण्याच्या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ग्रामीणमधील युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप युवा मोर्चा पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी केले आहे.



