Uncategorized

दौंड तालुका काँग्रेसच्या निरीक्षकपदी काकासाहेब देवकर यांची नियुक्ती

विजय शिंदे

इंदापूर : पुणे जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या “निरीक्षक” पदावर काकासाहेब देवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल पुणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लहू अण्णा निंबाळकर यांनी देवकर यांचे अभिनंदन केले. दौंड तालुक्यातील पक्ष संघटन मजबूत करणे, बूथनिहाय आढावा घेणे, कार्यकर्त्यांशी समन्वय साधणे आणि पक्षाच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

याबाबतचे नियुक्तीपत्र पुणे जिल्हा काँग्रेस समितीने जारी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button