Uncategorized
गणरायाच्या आगमनानंतर वडापुरी परिसरात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

विजय शिंदे
गणरायाच्या आगमनानंतर इंदापूर तालुक्यातील वडापुरी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी पिके करपण्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही ठिकाणी पाण्याअभावी दुष्काळाची छाया जाणवू लागली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळण्यास मदत झाली असून, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
या पावसामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळाल्याचे शेतकरी सांगत आहेत. पावसाने दिलासा मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.



