Uncategorized
इंदापूरात भरत शेठ शहा मित्र परिवारातर्फे दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी; मैदानाचे भूमिपूजन संपन्न.

विजय शिंदे
इंदापूर शहरात दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाची तयारी सुरू झाली असून, यंदाही भरत शेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दहीहंडी उत्सवासाठी तयार करण्यात येणाऱ्या मैदानाचे भूमिपूजन आज नगराध्यक्ष भरत शेठ शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंदापूर नगर परिषदेचे नगरसेवक, गटनेते तसेच भरत शेठ शहा मित्र परिवारातील सदस्य व मान्यवर उपस्थित होते.इंदापूर शहरातील नागरिकांसाठी दरवर्षी हा दहीहंडी उत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, मनोरंजन कार्यक्रमांसह परिसरातील विविध गोविंदा पथकांसाठी ही दहीहंडी पर्वणी ठरते.
यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.



