इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या विरोधात २५ नोव्हेंबरला भव्य जनआक्रोश मोर्चा; निष्पक्ष चौकशीची मागणी

विजय शिंदे
इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कारभाराविरोधात जनतेच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तहसीलदारांच्या कारभाराची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या मोर्चाची सुरुवात इंदापूर नगरपालिकेच्या मैदानापासून होऊन तहसील कार्यालय, इंदापूर येथे मोर्चाचा समारोप होणार आहे.
प्रदीप दादा गारटकर मित्र परिवार आणि प्रवीण भैय्या माने मित्र परिवार यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तहसीलदारांच्या कारभाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करून नागरिकांना न्याय मिळावा, अशी आयोजकांची भूमिका आहे.
या जनआक्रोश मोर्चामध्ये इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



