Uncategorized
इंदापुरात उद्या महायुतीचा महामेळावा; भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ.

विजय शिंदे
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन.
इंदापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी इंदापुरात ‘महायुतीचा महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.
हा महामेळावा सकाळी ११ वाजता इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे होणार असून, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



