Uncategorized

सुधाकर बोराटे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या इंदापूर तालुका प्रमुखपदी निवड.

विजय शिंदे

गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याची जबाबदारी.

  • गोरगरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या इंदापूर तालुका प्रमुखपदी सुधाकर बोराटे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक-अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर बोराटे यांची ही निवड करण्यात आली आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये राखीव खाटांचा लाभ मिळवून देणे, निकषात बसणाऱ्या गरीब रुग्णांवर मोफत अथवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करून देण्यासाठी मदत करणे, तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे, अशी जबाबदारी नमूद करण्यात आली आहे. तसेच गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या गोरगरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पक्षप्रमुख वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट आदी विविध माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.या प्रसंगी महेश लोंढे.जिल्हा समन्वयक, सतिश गावडे,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख,सुनिल निंबाळकर.उपजिल्हा प्रमुख,पुष्पांजली जडे.बारामती तालुका समन्वयक,डाॅ.अनिल जडे, विद्या गायकवाड इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

—————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button