Uncategorized

दिवाळीच्या खरेदीसाठी अधिश्री टेक्सटाईलमध्ये ग्राहकांसाठी खास धमाकेदार ऑफर!

आंथुर्णे येथील अधिश्री टेक्सटाईलमध्ये दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्सची पर्वणी

इंदापूर | विजय शिंदे

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि नव्या कपड्यांच्या खरेदीचा सण! याच पार्श्वभूमीवर आंथुर्णे (ता. इंदापूर) येथील अधिश्री टेक्सटाईलमध्ये ग्राहकांसाठी खास कपड्यांची धमाकेदार ऑफर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अधिश्री टेक्सटाईलचे मालक हर्षवर्धन जाधव व अनिकेत जाधव या जाधव बंधूंनी दिवाळीच्या सणानिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक खरेदीची संधी उपलब्ध करून दिली आहे.

कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी नवीन कपडे खरेदी करण्याची दिवाळीत लगबग असते. महिला, पुरुष, तरुणाई तसेच लहान मुलांच्या कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी अधिश्री टेक्सटाईलमध्ये खास नियोजन करण्यात आले आहे.

दर्जेदार कपडे, ग्राहकांच्या आवडीनिवडीला प्राधान्य आणि दिवाळीनिमित्त खास ऑफर्स ही अधिश्री टेक्सटाईलची ग्राहकांसाठी विशेष पर्वणी ठरत आहे. ग्राहकांचा विश्वास आणि समाधान यांना महत्त्व देत हर्षवर्धन जाधव व अनिकेत जाधव हे बंधू ग्राहकांना खरेदीचा आनंद देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

या दिवाळीत संपूर्ण कुटुंबाच्या कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी अधिश्री टेक्सटाईल, आंथुर्णे येथे अवश्य भेट द्यावी व आकर्षक ऑफर्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालक हर्षवर्धन जाधव व अनिकेत जाधव यांनी केले आहे.

अधिश्री टेक्सटाईल, आंथुर्णे (ता. इंदापूर)

दिवाळीचा सण, नव्या कपड्यांची शान आणि खरेदीवर खास ऑफर!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button