Uncategorized

इंदापुरात SIR प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले!तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या कार्यपद्धतीला समर्थन.

विजय शिंदे

इंदापूर : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर (SIR) प्रक्रियेवरून इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राहुल मखरे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे आणि जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकाळ यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या मोर्चाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या कार्यपद्धतीला समर्थन दर्शविले.

दरम्यान, एसआयआर प्रक्रियेचा वापर करून इंदापूर तालुक्यातील दलित आणि मुस्लिम समाजातील मतदारांची नावे मतदार यादीतून हटविण्याचा प्रयत्न भाजपाने करू नये, असा स्पष्ट इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिला. मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी, अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल मखरे यांनी मतदार यादीतून नाव वगळण्यावरून काही व्हाईस रेकॉर्ड समोर आणत भाजप पक्षावर गंभीर आरोप केले.

या पत्रकार परिषदेला सभापती हर्षवर्धन लोंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, सचिन खामगळ, पंचायत समिती सदस्य दिलीप भिसे, पोपट शिंदे, शेखर पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

एकीकडे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या समर्थनार्थ राजकीय नेते एकवटले असताना दुसरीकडे एसआयआर प्रक्रियेवरून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांमुळे इंदापूरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button