Uncategorized
इंदापूर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

विजय शिंदे
इंदापूर : इंदापूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात जोरदार सरी कोसळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, आज झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
पावसामुळे शेतातील जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होणार असून पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रामीण भागातील विविध ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र आहे.



