Uncategorized
Trending

साखरेच्या वाढत्या दरांना ब्रेक; केंद्राच्या निर्णयानंतर दरात १८ टक्क्यांची घट.

विजय शिंदे

साखरेच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत विक्रमी पातळीवर पोहोचलेले साखरेचे दर आता घसरले असून, ६७ रुपये प्रति किलोवर गेलेली साखर आता ५५ रुपये प्रति किलोवर आली आहे.

केंद्र सरकारने साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी घेतलेल्या दोन महत्त्वपूर्ण निर्णयांचा परिणाम बाजारात दिसून आला आहे. बाजारातील उपलब्धता कायम ठेवण्यासाठी साखरेच्या आयातीला मंजुरी देण्यात आली असून, साठेबाजी रोखण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत.खाद्य सचिव संजीव चोपडा यांनी सांगितले की, साखर कारखान्यांकडून करण्यात आलेल्या दरवाढीमुळे बाजारात साखरेच्या किमती वाढल्या होत्या. मात्र केंद्राच्या उपाययोजनांनंतर दरात घट सुरू झाली आहे.गेल्या १५ दिवसांत साखरेचे दर विक्रमी ६७ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले होते.

त्यानंतर केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे दरात सुमारे १८ टक्क्यांची घट झाली आहे.आयात केलेली साखर बाजारात उपलब्ध झाल्यानंतर आणि पुरवठा साखळी सुरळीत झाल्यानंतर येत्या काही दिवसांत साखरेचे दर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे खाद्य सचिवांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button