Uncategorized

कार्यालयातून थेट वर्गात; इंदापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे.

विजय शिंदे

भाटनिमगाव येथे अपूर्ण घरकुलांची पाहणी; मुख्यमंत्री पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या गट विकास अधिकारी सचिन खुडे यांच्या सूचना.

भाटनिमगाव : पंचायत समिती इंदापूरचे गटविकास अधिकारी सचिन खुडे व विस्तार अधिकारी मारकड, पंचायत समिती सदस्य अर्चना अजित खबाले यांनी भाटनिमगाव येथे भेट देऊन अपूर्ण घरकुलांची पाहणी केली. यावेळी संबंधित लाभार्थ्यांना घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी गावातील विविध विकासकामांचीही पाहणी करण्यात आली. तसेच २० टक्के मुख्यमंत्री पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायतीने करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा योग्य वापर, सीसीटीव्ही कॅमेरे, वाय-फाय सुविधा, सोलर व्यवस्था, स्वच्छता तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालये आदी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी शाळेला भेट दिल्यानंतर स्वतः खडू हातात घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक प्रश्न विचारून त्यांची परीक्षा घेतली तसेच फळ्यावर शिकवित विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले. अधिकाऱ्यांनी शिक्षकाची भूमिका घेत विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.

ग्रामपंचायतीमार्फत शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तसेच आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याबद्दल गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी समाधान व्यक्त केले. २० टक्के मुख्यमंत्री पंचायत राज अभियान व मुख्यमंत्री समृद्ध अभियान गावात प्रभावीपणे राबवून शासनाच्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती इंदापूरच्या सदस्या अर्चना अजित खबाले, ग्रामविकास अधिकारी निलेश यादव, मुख्याध्यापक योगीराज गाडेकर, माळी सर, गजानन जाधव, तसेच शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब पवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button