आझाद शत्रू नेतृत्व, दूरदृष्टी आणि विकासाची अखंड वाटचाल.

मा श्री हनुमंत (भाऊ) जाधव
संचालक कर्मयोगी सहकारी साखर कारखाना इंदापूर
माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस म्हणजे इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या वाटचालीचा गौरव करण्याचा दिवस आहे. शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे.इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हर्षवर्धन पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शेती, सहकार, शिक्षण, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण कामांना चालना मिळाली. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी विकासाचा मजबूत पाया उभा केला.उजनी धरण परिसरातील मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मच्छीमार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. तसेच मंत्रीपदाच्या कार्यकाळात महावितरण आणि ऊर्जा विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वीज, कृषी पंप आणि ऊर्जा संबंधित समस्या सोडविण्यासाठी प्रभावी काम केले.छोट्या पाटबंधारे प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचन क्षेत्र वाढविण्यावर त्यांनी भर दिला. यामुळे शेतीला बळकटी मिळाली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. सहकार क्षेत्रातील कर्मयोगी सहकारी साखर कारखाना आणि निरा-भीमा सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून तालुक्यात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या तसेच आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लागला.राजकारणात पदापेक्षा जनसेवेला महत्त्व देत हर्षवर्धन पाटील यांनी सर्वपक्षीय संबंध जपले. विकासाची दृष्टी, प्रशासनाचा अनुभव आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे ते इंदापूर तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात.त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.



